बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तीन महिन्यापूर्वी सैन्यात भरती झालेल्या 22 वर्षीय प्रथमेश पवार यांना जम्मूत वीरमरण!

मुंबई | सातारा जिल्ह्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) यांना कर्तव्यावर असताना जम्मू सांबा ब्लॉक येथे झालेल्या चकमकीत वीरमरण आलं.

प्रथमेश संजय पवार हे तीन महिन्यांपूर्वीच सैन्यदलात भरती झाले होते. सीमा सुरक्षा दलात दाखल होण्याचं स्वप्न लहानपणापासूनच पवार यांनी पाहिलं होतं. अवघ्या तीन महिन्यापूर्वी भरती झालेले प्रथमेश पवार यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे.

अचानक दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतानाच प्रथमेश यांना गोळी लागली. यात ते गंभीर जखमी झाले होते.

सैन्यदलात दाखल होऊन तीन महिने झाले असतानाच देशसेवा बजावताना प्रथमेश यांना वीरमरण आले. त्यामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात बुडवलं पाहिजे…”

सर्वात मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी; पेट्रोल डिझेलबाबत सरकारची मोठी घोषणा

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More