Top News महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांकडून महावितरणाने केली 22 हजार कोटींची लूट!

मुंबई | गेल्या 5 वर्षांमध्ये महावितरण कंपनीने वीज बीलापोटी राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांची लूट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा दावा वीज नियामक आयोगाने केलेल्या समीतीने आपल्या आहवालामध्ये दिला आहे.

राज्यातल्या गोरगरीब 44 लाख शेतकऱ्यांंसाठी कृषीपंपासाठी दिली जाणारी वीज शेतकरी वापरत नाहीत. 3 एचपीचा शेतीपंप वापरणाऱ्या 2 लाख 54 हजार 636 शेतकऱ्यांकडून 5 एचपीच्या शेतीपंपाची बीलं देण्यात आली. 7.5 एचपी शेतीपंप वापरणाऱ्या 12 हजार 604 शेतकऱ्यांना 10 एचपी शेतीपंपाची बील पाठवून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

2014 ते 2019 या 5 वर्षांमध्ये शेतकरी आणि सरकारकडून शेतकऱ्यांनी जी वीज वापरलीच नाही त्याच्या बीलापोटी 30 हजार कोटी रुपये वसूल केलेल्याचं दिसतंय. कालपर्यंत बोललं जात होतं शेतकऱ्यांकडून 40 हजार कोटी रुपये येणं आहे मात्र आता शेतकऱ्यांकडून पाचच वर्षात अतिरिक्त 30 हजार कोटी रुपये वसूल केल्याचं समोर आलं.

दरम्यान, शेतकऱ्यांनी थकबाकी भरायची का शेतकऱ्यांना थकबाकी द्यायची हा प्रश्न आता पडलाय. महावितरणाकडून गोरगरीब शेतकऱ्यांची लूट झाली असल्याचं चित्र समोर आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी; टिंगरे, म्हणे तो मी नव्हेच!

कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर पवार साहेबांना आठवा- रोहित पवार

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांचं गृहमंत्र्यांना पत्र; पोलिसांसाठी केली ‘ही’ मागणी

सिलेंडर घेऊन बसलेल्या स्मृती इराणींचा फोटो ट्विट करत राहुल गांधी म्हणाले…

पुण्यात थांबून राज ठाकरेंनी घेतला ‘या’ व्यक्तीचा सल्ला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या