बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात 23 हजार 350 नव्या कोरोना बाधितांची नोंद

मुंबई |  राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतात. राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान राज्यात २३,३५० नवीन रुग्णांचे निदान झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात २३,३५० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ९,०७,२१२ झाली आहे. तर राज्यात आज रोजी एकूण २,३५,८५७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज ७,८२६ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६,४४,४०० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ७१.०३ % एवढं झालं आहे.

राज्यात आज ३२८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.९३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४६,४७,७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९,०७,२१२ (१९.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,९६,०७२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,५०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या-

IPL चं वेळापत्रक जाहीर, या दोन संघांमध्ये रंगणार सलामीचा सामना

“हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये कलाकार सर्रास ड्रग्जचं सेवन करतात”

“दाऊदच्या सात पिढ्या आल्या तरी मातोश्रीचं काही वाकडं करु शकणार नाही”

‘एकजूट होऊन कोरोनाशी लढूया’; ‘या’ भाजप नेत्याचं मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More