बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

23 वर्षीय तरुणीचा 14 वर्षाच्या मुलावर बलात्कार, तर बहिणीवर प्रियकराचे अत्याचार

मुंबई | गेल्या काही वर्षांमध्ये अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. लहान मुलांवर अत्याचार केल्यास पोस्को कायद्याअंतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाते. त्यातच आता 23 वर्षीय तरूणीने 14 वर्षाच्या मुलावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरूणीने अल्पवयीन मुलावर अमानुषपणे वारंवार अत्याचार केले. ही विकृत तरूणी एवढ्यावरचं थांबली नाही तर प्रियकराकडून अल्पवयीन मुलाच्या बहिणीवर देखील वारंवार अत्याचार केले.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही विकृत घटना घडली आहे. अत्याचार करणारी तरूणी अल्पवयीन मुलाची नातेवाईक असल्याची माहिती आहे. जर होत असलेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी ही तरूणी बहिण- भावाला देत होती.

गेल्या काही महिन्यांपासून आरोपी तरूणी बहिण-भावाचं लैंगिक शोषण करत होती. मात्र, धमकी दिल्यामुळे दोघांनीही कुठेही या प्रकाराची वाच्यता केली नाही. शेवटी अनेक वेळा होत असलेल्या लैंगिक शोषणामुळे बहिण-भावाने घरच्यांना सांगण्याचं धाडस केलं. त्यानंतर नातेवाईकांनी कल्याण पुर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर घटनेचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा, एकाला थेट गोळी घातली, पाहा व्हिडीओ-

पत्नीच्या खुलास्यानं सोलापूर हादरलं, अश्लील व्हिडीओ पाहून पती…

कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी?, ‘या’ दोन नावांची चर्चा!

निवडणूक जिंकली मात्र घरच्यामुळे आयुष्याची लढाई हरली, उचललं टोकाचं पाऊल

नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला दणका, स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More