झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी उद्धव ठाकरे आता पंढरपूर दौऱ्यावर!

उद्धव ठाकरे

मुंबई | अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता पंढपूरला दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 24 डिसेंबरला पंढरपूरमध्ये सभा घेणार, असं त्यांनी जाहीर केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

निवडणुका आल्यावर राम मंदिराचा प्रश्न समोर येतो. मात्र निवडणुका झाल्या आणि सत्ता आली की हा प्रश्न पुन्हा धूळ खात पडतो, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

राम मंदिराच्या प्रश्नाबाबत इतकी वर्ष झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी आपण पंढरपूरला जात आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, अयोध्येला जाऊन आलो म्हणजे राम मंदिराचा विषय सोडला असं नाही, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.

महत्वाच्या बातम्या-

-सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काँग्रेसला शाेकसभा सुरु आहे असं वाटत होतं- नरेंद्र मोदी

-आम्ही राम मंदिराचा विषय अजून सोडून दिलेला नाही- उद्धव ठाकरे

-आता कितीही वेळा काढा एटीएममधून पैसे; स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर

-कांदा विकून मोदींना पाठवली होती मनी आॅर्डर; त्याला मिळाला ‘हा’ प्रतिसाद

-माझं नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात- नरेंद्र मोदी