नवी दिल्ली | कोरोनाने चीनला मोठा आर्थिक फटका बसला आहे. चीनमधील तब्बल २४ मोबाईल कंपन्या आपला उत्पादन निर्मितीचा कारखाना भारतात स्थलांतरीत करण्याच्या तयारीत आहे. अमेरिका आणि चीनचामध्ये व्यापारासंबंधी वाढणारा तणाव आणि कोरोना विषाणूच्या वाढच्या संक्रमणामुळे या कंपन्या चीनच्या बाहेर आपला व्यवसाय नेणार आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सॅमसंग आणि अॅपलसारख्या कंपन्या भारतात व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. भारतात २४ मोबाईल कंपन्यांनी उत्पादन निर्मितीच्या कारखान्यासाठी ११,२२२ कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे वचन दिलं आहे.
याआधी या सर्व कंपन्या आपला व्यवसाय व्हिएतनाम, कंबोडिया, म्यानमार, बांगलादेश आणि थायलँड अशा विविध देशात नेणार होते. पण भारताने याबाबत तत्परता दाखवल्याने या कंपन्या भारतात येण्यास तयार आहे.
भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रॉडक्ट लिंक्ड इन्सेंटीव्ह (PLI) स्कीममधून भारतात १५३ अरब डॉलरमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन होऊ शकतं आणि यामुळे १० लाख लोकांना रोजगार मिळू शकतो. मार्च महिन्यात सरकारने मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी ६ टक्के इन्सेंटीव्ह दिला आहे. हळूहळू सरकार सर्वच क्षेत्रात इन्सेंटीव्ह देणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
मी डॉक्टरांचा अपमान नाही तर कम्पाऊंडरचा सन्मान केला, ‘त्या’ वादावर राऊतांचं स्पष्टीकरण
सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी घरी गेलेल्या ‘त्या’ मिस्ट्री गर्लचं गुपीत आलं समोर…
प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन
“…तर कोरोनाच्या लसीसाठी मी माझं शरीर देईन”
Comments are closed.