वाशिम | गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
पीडित तरुणीला आरोपीने सीट नंबर तुमची नसल्याचं कारण सांगून मागच्या सीटवर बसवलं आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला.
संबंधित तरुणीवरील बलात्काराची घटना 6 जानेवारीला घडली आहे. या घटनेनंतर तरुणीचं मानसिक स्वास्थ खचलं होतं. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने हा प्रकार समोर आला.
दरम्यान, पुणे पोलिसांनी वाशिम पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. तसेच या घटनेचा पोलिस तपास करत आहेत.
थोडक्यात बातम्या-
अमिताभ बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मलाच कॉपी केलं जातं- कंगणा राणावत
बर्ड फ्लूचं संकट मोठं आहे, सरकारने व्यावसायिकांना मदत करावी- देवेंद्र फडणवीस
‘…अन्यथा आम्ही कृषी कायद्यांवर बंदी घालू’; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं
“मोदींनी पक्ष्यांना दाणे खायला घातल्याने पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले”
“बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या”