बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे तर भाजपचं षडयंत्र, कारवाईची माहिती भाजप नेत्यांनाच समजतेच कशी?”

अहमदनगर | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीची टांगती तलवार आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. ते जिल्ह्याधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

ओढून ताणून प्रकरणे तयार करायची आणि राज्यातील मंत्र्यांना बदनाम करायचे. असे भाजपचे सध्या षडयंत्र आहे. ईडीकडून होणाऱ्या कारवाईची माहिती भाजप नेत्यांनाच कशी समजते? सध्या ईडी आणि सीबीआयची कार्यालये म्हणजे भाजपची कार्यालये झाली आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर केली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोणताही गुन्हा केला नाही तरी त्यांना त्या गुन्हांमध्ये गोवण्याचे काम केले जात आहे. असेच महाविकास आघाडीतील इतर मंत्र्यांच्याबाबतही घडत आहे. जे खरे मनी लॉन्ड्रिंग करीत आहेत त्यांना सोडून दिलं जात आहे आणि जे करीत नाही त्यांना जाणीवपुर्वक गोवलं जात आहे. अशा प्रकरणाबाबत ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत. ते भाजपमध्ये गेले आहेत. ज्यांना ईडीच्या नोटीसा दिल्या आहेत. त्यांचं पुढं काय झालं आहे?असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, आगामी काही काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्यातील पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असून स्वतंत्र लढण्याचा एखाद्याचा आग्रह असेल तर त्याला आम्ही काही करू शकणार नाही. त्यासाठी निवडणुका अगोदर निर्णय घेतला जाईल, असंही जयंत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘उसूलो पर आंच आए तो टकराना जरुरी है’; राजीनाम्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी सोडलं मौन!

गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर

‘जर एखादं गटारातून बाहेर येत नाल्यात पडत असेल तर…’; कन्हैया कुमारच्या पक्षांतरावर भाजपची टीका

‘या’ गोष्टीमुळे गुगलचे मॅनेजर सुंदर पिचई दिवसभर असतात एनर्जेटीक, जाणून घ्या!

‘बांधावर जायच्या आधी जयंत पाटील चंद्रावर…’; गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More