बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला मोठा धक्का?; 25-30 आमदार अन् 2 खासदार भाजप सोडण्याच्या तयारीत?

कोलकाता | बंगालमधील भाजप नेते सुवेंद्रु अधिकारी राज्यपाल जगदीप धनखड यांना भेटण्यासाठी पोहचले असता त्यांच्यासोबत 77 आमदारांपैकी 51 आमदारच उपस्थित होते. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला मोठा झटका बसणार असल्याचं बोललं जात आहे.

भाजपतील अनेक लोकांसोबत माझं बोलणं सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांसह अनेक नेते भाजपत सामील झाले होते. ज्यातील अनेक नेत्यांनी पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असं मुकुल रॉय यांनी सांगितलं.

भाजपचे जवळपास 25-30 आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये येऊ शकतात त्याशिवाय भाजपचे 2 खासदारही तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, असं मुकुल रॉय यांच्यासोबत तृणमूलमध्ये परतेले त्यांचे चिरंजीव शुभ्रांशू यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुकुल रॉय यांचा दावा भाजपने फेटाळून लावलाय. पक्षातील कोणताही आमदार मुकुल रॉय यांच्या वाटेवर जाणार नाही, असं भाजपने म्हटलं आहे. मात्र जुने नेते आणि कार्यकर्ते यांना आपल्या तंबूत ओढण्याचं काम टीएमसीने सुरू केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…त्या शुक्राचार्यांचं पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही’; नितीन राऊत आक्रमक

कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराचं सीरम?; भारत बायोटेक अन् केंद्र सरकारनं दिलं स्पष्टीकरण

पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आणि आजची शिवसेना कुठे?”

“सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More