NCP l गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आहे. एकीकडे राष्ट्रवादीचा शरद पवार गट तर दुसरीकडे अजित पवार गट. हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादीच्या पक्षावर हक्क गाजवत आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आज राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष फुट पडल्यानंतर प्रथमच आज दोन्ही पक्ष वर्धापन दिन साजरा करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पक्ष हा मुंबईमध्ये वर्धापनदिन साजरा करणार आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पक्ष हा अहमदनगरमध्ये वर्धापन दिन अगदी जल्लोषात साजरा करणार आहे. गेल्या वर्धापन दिनाला शरद पवारांनी अत्यंत मोठा धक्का दिला होता.
कारण त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली होती. अगदी त्यावेळी शरद पवारांनी भाकरी फिरवत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यामुळे शरद पवार हे सत्तेत आहेत की नाहीत किंवा त्यांना बहुमत आहे किंवा नाही हे महत्वाचे नाही. कारण शरद पवार हा ‘फॅक्टर’ महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात जास्त मानला जाणारा भाग आहे.
NCP l रौप्यमहोत्सवाचा मान अहमदनगरकरांना :
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आज अहमदनगर येथे 25 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी या राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सवी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व नवनिर्वाचित खासदार व आमदार तसेच माजी आमदार देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतरचा आजचा वर्धापन दिन हा सर्वात विशेष महत्वाचा असणार आहे. कारण राष्ट्रवादीचे दहापैकी आठ खासदार निवडून आले आहेत. याशिवाय शरद पवारांच्या टीममध्ये नेहमीच काहीतरी सरप्राईज पॅकेज ठरलेलं असतं असं सूचक वक्तव्य अहमदनगर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी नुकतेच केले आहे.
लोकसभा निवडणुकीत अहमदनगरला मिळालेल्या रोमांचक विजयानंतर नगर शहरात पहिला विजय मेळावा यानिमित्ताने पार पडणार आहे. मात्र अशातच यंदाच्या वर्षीचा रौप्यमहोत्सवाचा मान हा नगरकरांना मिळाला आहे. मात्र या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार कधी काय करतील याता नेम नसतो, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकींच्य पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या नगर मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे.
News Title : 25th Anniversary of NCP
महत्त्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारमध्ये कोणकोणत्या नेत्यांनी घेतली शपथ; जाणून घ्या एका क्लिकवर
हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना महत्वाचा इशारा
नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच झाला दहशतवादी हल्ला; काँग्रेसच्या बड्या नेत्याने साधला निशाणा
या राशीच्या व्यक्तींनी प्रवास करणे टाळावा
पहिल्याच टर्ममध्ये मुरलीधर मोहोळांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ!