बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती होणार?, ‘त्या’ मेसेजमुळे खळबळ

मुंबई | मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातून एक मेसेज प्राप्त झाला आहे. मुंबई मध्ये 26/11 सारखा भयंकर हल्ला करण्याची धमकी त्यात दिली आहे. या मेसेजविषयी पोलिसांकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. पण यामुळे मुंबईच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

आम्ही मुंबईला पुन्हा एकदा उडवण्याची तयारी केली आहे. यावेळीही 26/11 सारखा हल्ला केला जाईल. मी पाकिस्तानातून बोलत आहे. तुमचे काही भारतीयही आमच्यासोबत आहेत. त्यांचीही मुंबईला उडवण्याची इच्छा आहे. या हल्ल्यामुळे 26/11 हल्ल्याच्या स्मृती ताज्या होतील, असं त्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलंय.

दरम्यान, ही धमकी नाही याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल. माझे लोकेशन पाकमध्ये ट्रेस होईल. पण काम मुंबईत होईल. आमचा कोणताही ठिकाणा नसतो. त्यामुळे लोकेशन तुम्हाला आऊट ऑफ कंट्री ट्रेस होईल. उदयपूरसारखा शीर धडावेगळे करण्याचाही हल्ला होऊ शकतो, असा दावा धमकी देणाऱ्याने केला आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More