Loksabha Result l राज्यात लोकसभा निवडणूक 2024 ही अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. या निवडणुकीत भाजप पक्षाला सर्वात मोठ्या धक्का बसला होता. या निवडणुकीत महायुतीला अवघ्या 17 जागांवर यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीला तब्बल 30 जागांवर यश मिळालं आहे. तसेच इतर पक्षाला एका जागेवर यश मिळालं आहे.
राज्यात सर्वाधिक खासदार मराठा समाजाचे :
राज्यातील लोकसभा निवडणुकीत नवनिर्वाचित 48 खासदारांपैकी 26 खासदार हे मराठा समाजाचे, तर 9 खासदार हे ओबीसी समाजाचे आहेत. याशिवाय अनुसूचित जातींचे 6 खासदार निवडून आले, तर अनुसूचित जमातींचे 4 खासदार निवडणून आले आहेत.
वर्ष गायकवाड या अनुसूचित जातीच्या असल्या तरी त्या खुल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या एकमेव उमेदवार ठरल्या आहेत. राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या अधिक राहिली आहे. यावेळीही तेच चित्र दिसून आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत कळीचा ठरला होता.
Loksabha Result l मराठा समाजाचे खासदार :
उदयनराजे भोसले, शाहू छत्रपती, डॉ. शोभा बच्छाव, नारायण राणे, श्रीकांत शिदि, स्मिता वाघ, नरेश म्हस्के, विशाल पाटील सुप्रिया सुळे, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, धैर्यशील मोहिते, अरविंद सावंत, धैर्यशील माने, संजय देशमुख, प्रतापराव जाधव, राजाभाऊ वाजे, बजरंग सोनवणे, निलेश लंके, संदीपान भुमरे, वसंत चव्हाण, नागेश आष्टीकर, डॉ. कल्याण काळे, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संजय जाधव, अनुप धोत्रे.
ओबीसी समाजाचे खासदार :
डॉ. अमोल कोल्हे, सुनील तटकरे, रवींद्र वायकर, रक्षा खडसे, प्रतिभा धानोरकर, डॉ. प्रशांत पडोळे, सुरेश म्हात्रे, अमर काळे, संजय दिना पाटील.
अनुसूचित जमातींचे खासदार :
भास्कर भगरे, डॉ. हेमंत सावरा, डॉ. नामदेव किरसान, गोवाल पाडवी.
अनुसूचित जातींचे खासदार :
भाऊसाहेब वाकचौरे,, डॉ. शिवाजी काळगे, वर्षा गायकवाड, श्यामकुमार बर्वे, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे.
News Title : 26 Maratha MPs in the state, see how many MPs from other castes got elected
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्रातील नेत्यांची इतर राज्यात कमाल! विनोद तावडेंच्या कष्टाचं झालं चीज
कुठलाच प्रचार केला नाही, तरी तिसरी पास सालगड्याला पडली लाखभर मतं
अरे व्हा! या कारने घातलीये तरुणाईला भुरळ; किंमत व स्पेसिफिकेशन काय?
…तर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत; ‘या’ नेत्याने केला सर्वात मोठा दावा
इंडिया आघाडीच्या ट्विटने उडवली भाजपवाल्यांची झोप; पाहा काय आहे ट्विट