बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नक्षलवाद्यांविरूद्ध कोम्बिंग ऑपरेशन! चकमकीत मिलींद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती

गडचिरोली | नक्षलवादाविरोधात पोलिसांना मोठे यश मिळाळ्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील मुरूम गावात मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथकाने एकूण 26 नक्षलवाद्यांना ठार केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये माओवादी नेता मिलींद तेलतुंबडे याचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे.

कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. आज सकाळीच पोलिसांना मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून लपलेल्या नक्षलवाद्यांना ठार केलं. यामध्ये मिलींद तेलतुंबडेदेखील ठार झाल्याचं माहिती मिळतं आहे.

नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या या चकमकीत पोलिस पथकातील तीन जवान मात्र गंभीर जखमी झाले. या जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूरला उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. नक्षलवाद्याविरोधातील कोम्बिंग ऑपरेशनला पोलिसांना यश मिळाले.

मिलींद तेलतुंबडे हा माओवादी नेता होता. तो मागील अनेक वर्षे नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय होता. तेलतुबंडे हा मुळचा वणी येथील असून त्याने भाकप माओवादी पक्षाच्या सचिवपदी काम पाहिलेलं आहे. तसेच मिलींद तेलतुंबडे हा लेखक आनंद तेलतुंबडे यांचा छोटा भाऊ आहे. त्याच्या मृत्यूमुळे नक्षलवाद्यांची ताकद कमी होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

कंगना राणावतच्या अडचणीत वाढ; काँग्रेसने केली पोलिसांकडे तक्रार

“मी पण एसटी कामगाराचा मुलगा असल्याने मला…”

“शरद पवार आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून ते एकच आहेत”

रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा…- नितेश राणे

“नोटबंदीमुळे आपण कॅशलेस होण्याऐवजी लेसकॅश झालो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More