बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागपूर विधान परिषद निवडणूक: भाजपचा काॅंग्रेसवर दणदणीत विजय, बावनकुळे पुन्हा आमदार

नागपूर | नागपूर विधान परिषद जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर (Nagpur Legislative Council Election Results) झाला आहे. हा निकाल भाजपच्या बाजूने लागला असून भाजपनं काॅंग्रसेवर दणदणीत विजय मिळवलाय.

विधान परिषदेच्या नागपूर जागेच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या होत्या. एकतर्फी विजय झाला असून भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandra shekhar Bawankule)  हे विजयी झाले झाले आहेत. 362 मते घेऊन बावनकुळे विजयी झाले आहेत.

महाविकास आघाडीची मतं फुटल्यानं एकच खळबळ माजली आहे. छोटू भोयर यांना फक्त एक मत मिळालं. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांना 186 मतं मिळाली आहेत. तर, चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत.

दरम्यान,  मतमोजणीच्या अवघ्या काही तासांपूर्वी काँग्रेसने आपल्या उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यांमुळे महाविकास आघाडीची जवळपास 16 मते फुटली असल्याचे समोर आले.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! म्हाडा पेपर फोडण्यासाठी ‘या’ खास कोडवर्डचा केला वापर

अजब लग्नाची गजब वरात! नवरदेवाला घेऊन घोडा फरार, पाहा व्हिडीओ

आज इंधन दरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘….तर अशांना महाराष्ट्र सरकार खपवून घेणार नाही’; सुप्रिया सुळे आक्रमक

बेशिस्त वाहनचालकांना प्रशासनाचा चपराक; आता नियम मोडले तर..

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More