बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आपण सर्वात वाईट टप्प्यातून जाऊ शकतो’; Omicronविषयी बिल गेट्सचा धक्कादायक इशारा

नवी दिल्ली | ओमिक्राॅन (Omicron)व्हेरिएंटनं जगाचं टेंशन आणखीनच वाढवलं आहे. रोज वाढत चाललेला संसर्ग पाहता परिस्थिती चिंताजनक झाली आहे. ओमिक्राॅनचा वाढता धोका पाहता काही ठिकाणी लाॅकडानही (Lockdown) जाहीर करण्यात येत आहे.

कोरोनाचा (Corona)नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) चांगलचा कहर केला आहे. जगभरातील ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं महत्त्वाची पाऊल उचलायला सुरुवात केली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी ओमिक्राॅन(Omicron)बाबत धक्कादायक इशारा दिला आहे.  गेट्स यांनी संक्रमणाबाबत एकामागून एक सलग 7 ट्विट करत  आपण लवकरच महामारीच्या सर्वात वाईट टप्प्यातून जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता अतिरिक्त काळजी घेण्याची गरज आहे.

दरम्यान, डेल्टाच्या तुलनेत तो निम्म्याहूनही प्रभावी मानला, तर ती चिंतेची बाब आहे, असंही बिल गेट्स यांनी म्हटलं. ओमिक्राॅनचा (Omicron) संसर्ग वाढत चालल्यानं नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या – 

सचिनने ‘तो’ प्रश्न विचारला अन् माझी झोपच उडाली; रणवीर सिंगने सांगितला किस्सा

रावते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो”; अजित पवारांनी मागे वळून पाहिलं अन्…

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पक्ष सोडण्याच्या तयारीत, एका ट्विटनं उडाली खळबळ

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात कडक लाॅकडाऊन लागू

प्रियांका-निकचा घटस्फोट?; अखेर प्रियांकाने सोडलं मौन, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More