बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एवढा स्टाफ काय करतो, काय झोपा काढतो काय’; अजित पवार संतापले

मुंबई | हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज तिसरा दिवस आहे. आजही विधानभवनात आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले. अधिवेशनात विरोधी पक्षानं अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी पक्षाला घेरलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे कर्मचाऱ्यांवर चांगलेच चिडलेले पहायला मिळाले.

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहाच्या प्रश्नपत्रिका सदस्यांना न वाटल्याने अनेक सदस्यांनी विधानसभेत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सदस्यांना प्रश्नपत्रिका न मिळाल्यानं अजित पवारही भडकलेले दिसले.

‘एवढा स्टाफ काय करतो, काय झोपा काढतो काय’, असं म्हणत अजित पवार संतापले आहेत. एवढा स्टाफ तुम्ही उभा करता त्यांच्या हातात गठ्ठा द्यायचा म्हणजे काम होईल, असं अजितदादांनी म्हटलं. सदस्यांना प्रश्नउत्तरपत्रिका मिळाली नाही त्यांच्या वेदना बरोबर आहेत, असंही पवारांनी म्हटलं.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजप (bjp) आणि महाविकास आघाडीचे (MVA) नेते आता आमनेसामने आले आहेत. त्यामुळे या पाच दिवसांच्या अधिवेशनात काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! विधानभवनासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

धक्कादायक! ‘या’ भागात 2 वर्षाच्या चिमुकल्याला Omicronची लागण

‘लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…’;

‘मांजर आडवं गेले तरी…’; नितेश राणेंच्या म्याव म्याववर शिवसेनेचं टीकास्त्र

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More