बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लसीचे डोस घ्या, नाहीतर कारवाई करु’; महापालिकेचा गंभीर इशारा

कल्याण | ओमिक्राॅननं राज्यात खळबळ माजवली आहे. वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ओमिक्राॅननं आता जगाचं टेंशन वाढवलं आहे. अशातच ओमिक्राॅनच्या (Omicron) धास्तीनं सरकारनं पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे.

ओमिक्राॅनचा उद्रेक होताना दिसत आहे. दिवसागणिक संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. संसर्ग असाच वाढत राहिला तर देशाला तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. ओमिक्राॅनचा वााढता संसर्ग रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने महत्त्वाचा इशारा दिला आहे.

सर्वांनी कोरोनाचे दोन डोस घ्या. ज्या दुकानदारांनी डोस घेतले नसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी आणि दुकानदारांना दिला आहे.

दरम्यान, ओमिक्रॉन आणि नववर्षाच्या (New Year) पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली (Corona Guideline) जाहीर केली. त्यानुसार निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“…पण अजित पवारांनी विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, असं धुडकावल्यासारखं सांगू नये”

“मला टार्गेट केलं जात आहे, त्यामुळे मला आत्महत्या करावीशी वाटतेय”

‘एसटी विलिनीकरण डोक्यातून काढून टाका’ अजित पवारांचा कर्मचाऱ्यांना इशारा

‘गेंड्याच्या कातडीचे सरकार झाले आहे’; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

‘राज्यात तिसरी लाट आलीच तर ती Omicronची असेल’; आरोग्यमंत्र्यांचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More