बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित आहे, पण मी का सांगू?”

कोल्हापूर | भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. संतोष परब (Santosh Rane) यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून नितेश राणे यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यामुळे नितेश राणेंना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. अशातच नितेश राणे गायब झालेले असून यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. “नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित आहे. पण मी का सांगू? त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत आहे. राज्याचा डिजी, राज्यातले पोलीस कशाला आले आहेत. मारहाण किरकोळ झाली आहे मग कशाला आले आहेत?,” असाही प्रश्न राणेंनी यावेळी विचारला आहे.

“नितेेश राणे काय आतंकवादी आहेत का? एका आमदारासाठी एवढी यंत्रणा कशाला. उजव्या बाजूला खरचटल्यावर 307 लावतात हे मी पहिल्यांदा बघतोय, असं राणे यावेळी म्हणाले आहेत. यावेळी पोलिसांनी आपल्या पत्नीची हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली असल्याचंही नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, नारायण राणेंनी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना डिवचल्याबद्दलही भाष्य केलं. “आदित्य ठाकरेंचा आणि मांजराचा काय सबंध, मला तरी वाटतं त्यांचा आवाज तसा नाही. वाघाची मांजर केव्हा झाली” असा टोलाचं नारायण राणे यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेंबुड त्याच्याच नाकाला’; रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल

Corona: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

“…तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म”; भास्कर जाधव कडाडले

पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागात अलर्ट जारी

‘तिसरी लाट आलीच तर ती…’; Omicron बाबत दिलासादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More