बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘याचं नाव घ्या आणि त्याचं नाव घ्या, लग्न बिघ्न आहे का माझं?’; अजित पवार संतापले

पुणे | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21 संचालक पदांसाठी निवडणूका होत आहेत. यावर पुण्यात बोलताना उपमुख्यंमंत्री अजित पवार (Ajit Pwar) यांनी पत्रकारांची चांगलीच शाळा घेतल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे सध्या त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत असलेली पहायला मिळत आहे.

माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘नाव घ्या… नाव घ्या…. आता काय सगळ्यांची नावं घेतो. सगळ्यांनी माघार घेतली सांगितलं ना. आपल्यातले काही लोकं ना? याचं नाव घ्या आणि त्याचं नाव घ्या. लग्न बिघ्न आहे का माझं?, असं म्हणत अजित पवारांनी भर सभेत हटके स्टाईलनं उत्तर दिलं. त्यामुळे त्यांच्या या उत्तराची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल ही निवडणूक लढवत आहे. अजित पवार यांच्यासह 21 पैकी 14 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 7 जागांसाठी मतदान होणार आहे. यातील सहकार पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात मेळाव्याचं आयोजन करण्यात आल होतं. यावेळी अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत अनेक वेळा बँकेचे अध्यक्षपदही पवार यांनी भूषवले आहे. मात्र, यावेळी पहिल्यांदाच पवार बिनविरोध निवडून गेले आहेत.

 थोडक्यात बातम्या – 

Corona: ‘मुंबईच्या बाहेरुन येणारी लोकं शिस्त बिघडवतात’; किशोरी पेडणेकर भडकल्या

Corona : कोरोना होऊ नये म्हणून घेतले 4 डोस, तरीही शेवटी…

WHOनं वाढवलं जगाचं टेंशन; ‘कोरोनाची त्सुनामी येणार अन्…’

Corona: सर्वात पहिल्यांदा लस घेतलेल्या अभिनेत्रीला कोरोनाची लागण

मुंबईनंतर आता ‘या’ ठिकाणीही 31st च्या पार्ट्यांवर बंदी, वाचा काय आहेत नियम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More