बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल, पाहा ‘तो’ व्हिडीओ

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन युद्धानं संपूर्ण जगावर चिंतेचं सावट पसरवलं आहे. या युद्धात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशातच रशिया युक्रेनवर सतत बॉम्बहल्ले करत आहे. युक्रेनमध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून ‘ऑपरेशन गंगा’ सुरु करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे काल मुंबईमध्ये ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात आलेल्या सातव्या विमानामधील विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर हजर होते. यावेळीचा राणेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये देशाचं आणि त्याच्या राजधानीचं नावं चुकीचं घेतल्याचं पहायला मिळत आहे. “विद्यार्थी युक्रेनमध्ये होते. तेथील परिस्थिती पाहून ते घाबरले होते. त्यामुळे ते तेथून जवळच्या देशामध्ये, ‘ओमानीया’मध्ये गेले. त्या देशाची राजधानी ‘बुखारीया’ आहे,” असं म्हणाले.

दरम्यान, राणेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर त्यांना ट्रोलही केलं जात आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

थोडक्यात बातम्या – 

“राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याचा भाजपचा डाव”

रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर काय परिणाम?, वाचा सविस्तर

“तर मी प्रत्येक रशियन सैनिकासोबत सेक्स करेन”

“काय गोंधळ घालायचाय ते घालू देत, नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही”

“आता मी आलोय, तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More