बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘द काश्मीर फाईल्स’ पाहिल्यानंतर कंगनानं बॉलिवूडकरांना मारला टोमना, म्हणाली…

मुंबई | सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘काश्मीर फाइल्स’(The kashmir files) या चित्रपटाची. 11 मार्च रोजी ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौत हिने कौतुकाचा वर्षाव केला आहे. द काश्मीर फाईल्सने बॉलिवूडचे सर्व पाप धुवून टाकले असं ती म्हणाली, कंगनाच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पापाराझींनीनं सोशल मीडियावर पोस्ट देखील केला आहे.

द काश्मीर फाईल्सने बॉलिवूडचे सर्व पाप धुवून टाकले, असं ती म्हणाली. यावेळी तिने इंडस्ट्रीतल्या इतर कलाकारांनाही टोला लगावला. उंदरासारखं बिळात लपून बसलेल्यांनी बाहेर यावं आणि या चित्रपटाचं प्रमोशन करावं अशा शब्दांत तिने बॉलिवूडकरांना टोमणा मारला आहे. नेहमी ते बकवास सडलेल्या चित्रपटांचं प्रमोशन करतात असं ती म्हणाली.

दरम्यान, अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती यांसह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका चित्रपटात पहायला मिळत आहेत.

थोडक्यात बातम्या-

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचं जगाला भावनिक आवाहन, म्हणाले…

सकाळचा चहा ठरू शकतो घातक, वाचा ‘हे’ गंभीर परिणाम

IPL खेळाडूंसाठी आणलेल्या बसेस मनसेने फोडल्या, वाचा काय आहे प्रकरण?

तळीरामांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान नाटोने दिलेल्या गंभीर इशाऱ्याने जगाचं टेन्शन वाढलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More