नवी दिल्ली | देशात महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहेत. वाढत्या महागाईमुळे देशभरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांना महागाईसंदर्भातील त्यांच्या जुन्या वक्तव्यावरून प्रश्न विचारला असता बाबा रामदेव चांगलेच भडकले.
देशातील तरूणाला 40 रूपयांना पेट्रोल (Petrol) आणि 300 रूपयांना सिलेंडर (Cylinder) देणारे सरकार हवे आहे, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी काँग्रेस (Congress) सरकारच्या काळात केलं होतं. हरियाणातील कर्नाल येथील एका कार्यक्रमात पत्रकाराने याच वक्तव्यावरून प्रश्न विचारला असता बाबा रामदेव चांगलेच भडकले.
सुरूवातीला तर बाबा रामदेव यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. मात्र, परत तोच प्रश्न विचारल्यावर बाबा रामदेव भडकले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून बाबा रामदेव यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. तर बाबा रामदेव यांनी या कार्यक्रमात बोलताना महागाईबद्दल देखील वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, महागाई कमी असायला हवी तर मेहनत देखील जास्त करायला हवी. एक संन्यासी असूनसुद्धा जर मी 18-18 तास काम करत असेन तर देशातील इतर जनताही जास्त वेळ काम करून जास्तीत जास्त मोबदला घेऊ शकते आणि वाढत्या महागाईला मात देऊ शकते, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.
पाहा व्हिडीओ-
2014 से पहले बाबा रामदेव जोर शोर से भाजपा के लिए प्रचार करते थे। भाजपा को वोट देने और ₹40 प्रति लीटर पेट्रोल पाने का वादा करते थे। आज पेट्रोल 100के पार है। पत्रकार ने जब सवाल किया तो पत्रकार को धमकी देने लगे। शर्मनाक। आइए बाबा के सभी प्रोडेक्ट का बहिष्कार करें। #BoycottPatanjali pic.twitter.com/FzfZ41Xg9P
— Hansraj Meena (@HansrajMeena) March 30, 2022
थोडक्यात बातम्या-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर नाराजी, शरद पवारांकडे केली तक्रार?
आर्थिक कोंडी फोडण्यासाठी रशियाने भारताला दिली ‘ही’ खास ऑफर
“…पण आम्ही देश वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू”
“भविष्यात नाना पटोलेंवरही धाडी पडल्यातरी मला आश्चर्य वाटणार नाही”
भाजप नेत्यांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सतीश उकेंच्या घरी ईडीची धाड
Comments are closed.