बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अचानक अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळेच…”

मुंबई | अमेरिकेने (America) इम्रान खान (Imran Khan) यांच्या खुर्चीला फटाका लावला असा आरोप केला जात असेल तर अमेरिकेचा पूर्व इतिहास पाहता वावगा म्हणता येणार नाही, अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे.

कालपर्यंत अमेरिकेच्या खैरातीवरती जगणारा आणि उठ म्हटलं की उठणारा पाकिस्तान (Pakistan) अचानक अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या (Russia) मांडीवर जाऊन बसल्यामुळे अमेरिकेचे पित्त खवळले, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

इम्रान खान यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा आरोप झुगारून दोन महिन्यांपूर्वी रशियाच्या पंतप्रधानांची भेट घेतली. त्याची किंमत आता इम्रान खान यांना भोगावी लागत असल्याचा आरोप रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला. इम्रान खान यांनी रशियात जाऊन पुतीन यांची भेट घेतल्यानंतर युद्धाला सुरूवात झाली. या कारणामुळे अमेरिकेने त्यांच्यावर ही वेळ आणल्याचं म्हटलं जात आहे,असंही सामन्यात म्हटलं आहे.

दरम्यान, पाकिस्तान आणि चीन हे आपले शेजारी देश आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवरती आपल्याला लक्ष ठेवावे लागते. आपली इच्छा असो किंवा नसो आपल्याला दोन्ही देशांच्या प्रत्येक घटनेवरती बारकाईने लक्ष ठेवावे लागते, असं देखील आजच्या सामन्यात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“…मग नवाब मलिक तुरूंगात असताना पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का नाही दाखवली? “

कोरोनाच्या XE व्हेरिएंटबद्दल तज्ज्ञांचा धक्कादायक दावा, म्हणाले…

पुतिन यांच्या मुलींविरोधात अमेरिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

काळजी घ्या! महाराष्ट्रासाठी पुढचे काही दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

मोठी बातमी! किरीट सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More