“हिंदू लोकांनो, तुम्ही चार मुलांना जन्म द्या आणि त्यातील दोन मुलं ही…”
कानपूर | सध्या सगळीकडे धार्मिक मुद्द्यावरुन वादविवाद सुरु असलेले पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेने रामोत्सवाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमादरम्यान साध्वी ऋतंभरा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. सध्या हे वक्तव्य जोरदार चर्चेत आलं असून यांचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत.
हिंदू लोकांनो, तुम्ही चार मुलांना जन्म द्या आणि त्यातील दोन मुलं ही देशासाठी द्या असं आवाहन साध्वी ऋथंबरा (Sadhvi Rithambara) यांनी केलं आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच खळबळ उडालेली पहायला मिळत आहे.
तुम्ही तर दोन मुलं जन्माला घातली आहेत. हम दो, हमारे दो.. पण माझी विनंती आहे की हिंदू समाजाच्या बांधवांनो, दोन नाही, चार मुलांना जन्माला घाला. त्यातली दोन मुलं देशासाठी समर्पित करा. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनतील. ते बजरंगदलाचे बजरंगदेव बनतील, असं साध्वी ऋथंबरा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुलांना विश्व हिंदू परिषदेशी जोडून देशाला समर्पित असं आवाहन करताना साध्वी ऋथंबरा म्हणाल्या की, देशामधील भविष्यातील लोकसंख्या संतुलन बिघडू द्यायचं नसेल तर समान नागरी कायदा लागू करावा. जर लोकसंख्येमधील संतुलन बिघडलं तर देशाचे भवितव्य धोक्यात येईल.
थोडक्यात बातम्या –
“ब्राम्हण मुठीतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करावी लागेल”
“पवार कुटुंबियांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळे…”
टेंशन वाढलं ! कोरोनाच्या चौथ्या लाटेचं सावट, WHO म्हणाले…
“एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानीसाठी शरद पवार जबाबदार”
राज ठाकरेंना धमकीचा फोन, केंद्र सरकार उचलणार ‘हे’ मोठं पाऊल
Comments are closed.