बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाषणापूर्वी ‘अशी’ असते राज ठाकरेंची अवस्था, शर्मिला ठाकरेंनी केला खुलासा

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) व त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी नुकतीच एबीपी माझाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांनी चौफेर विषयांवर भाष्य केलं.

1 मे रोजी राज ठाकरे औरंगाबादमध्ये जाहिर सभा घेणार आहेत. राज्यात हिंदुत्वाचा मुद्दा गाजत असल्याने राज ठाकरेंच्या या सभेकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. मात्र त्याआधी कोणत्याही सभेपूर्वी राज ठाकरेंची अवस्था कशी असते याचा खुलासा शर्मिला ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना केला आहे.

कुठल्याही सभेपूर्वी राज ठाकरे खोलीत एकटे बसतात आणि वाचन करतात. राज प्रचंड अभ्यासू आहेत. ते वाचत असताना कोणीही त्यांच्या जवळ जात नाही. राज ठाकरे कधीच वाचून भाषण करत नाहीत. त्यामुळे ते भाषणापूर्वी प्रचंड वाचन करतात, असं शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मला सभेपूर्वी भिती वाटते. माझ्या हाता-पायाला घाम फुटतो. कारण मलाच माहिती नसतं की मी सभेत काय बोलणार आहे, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“पाणी डोक्यावरून जात असेल तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल”

सभेच्या एक दिवस आधी राज ठाकरेंचा मोठा गौप्यसफोट, म्हणाले…

“उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते तेव्हा राज ठाकरे बाळासाहेबांसोबत राज्यभर दौरे करत होते”

राज ठाकरेंच्या सभेआधी अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई पोलिसांचा राणा दांपत्याबद्दल धक्कादायक दावा, ‘ही’ माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More