पुणे महाराष्ट्र

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 294 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

पुणे | पुण्यात आज दिवसभरात नव्याने 294 रुग्ण आढळल्याने प्रशासनासमोरची चिंता वाढली आहे. शहराची एकूण रुग्णसंख्या 7 हजाराच्या वर गेलेली आहे. आज दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 352 वर पोहचली आहे.

कोरोनावर उपचार घेणार्‍या 229 रुग्णांची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या दिवसाअखेर 4 हजार 348 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.

कोरोनाच्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत आकारण्यात येणारे भरमसाठ दर कमी करण्यासाठी राज्य सरकारने एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या खासगी प्रयोगशाळेत कोरोनाच्या चाचणीसाठी साडेचार हजार रुपये मोजावे लागत असल्याने गरीब रुग्णांना ते परवडू शकत नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन हे दर कमी करण्यासाठी या समितीची स्थापन करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातल्याने गर्भार हत्तीणीचा मृत्यू

“आप्पा… तुम्ही अंगीकारलेला लोकसेवेचा वसा मी पुढे सुरू ठेवणार हा माझा शब्द”

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज 2560 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?

लडाखमध्ये तुमचा हस्तक्षेप नको, आमचं आम्ही बघू; चीनचं अमेरिकला उत्तर

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पंधरा दिवसांत एक लाखावरून दोन लाखांवर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या