Top News महाराष्ट्र मुंबई

BREAKING- मुंबईत आज मध्यरात्रीपासून 15 जुलैपर्यंत जमावबंदी लागू!

मुंबई | मुंबईत आज रात्री 12 वाजल्यापासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 15 जुलैपर्यंती ही जमावबंदी असणार आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे हा निर्णय घेतला गेल्याचं मुंबई पोलिस आयुक्तांनी सांगितलं आहे.

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाची वाढती रूग्णसंख्या हा चिंतेचा विषय ठरला आहे. राज्यातला सगळ्यात मोठा बाधित आकडा हा मुंबई शहराचा आहे. अशातच अनलॉकिंगला सुरूवात झाल्यामुळे मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात होती.

सकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाने पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे

यापूर्वीसारखंच रात्री 9 ते सकाळी 5 या दरम्यान कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना यादरम्यान प्रवासाची मुभा असेल. तसंच सर्वसामान्यांना कामासाठी केवळ 2 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लालबागच्या राजाचा यंदा उत्सव नाही तर 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मादान!, मुख्यमंत्री म्हणतात…

आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही, पण तिरस्कार तरी करु नका- रामदेव बाबा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या