खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीचा मोठा खुलासा
मुबंई | बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने( Sushant Singh Rajput) 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यसंबधी अनेक गोष्टी समोर आल्या त्यातीलच एक म्हणजे सुशांत ड्रग्ज घेत होता, अशी बातमी समोर आली. सुशांतची मैत्रिण रिया आणि तिचा भाऊ शौविकला अन्य ड्रग्स पेडलर्ससोबत याप्रकरणात अटक करण्यात आली होती. आता याप्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे.
रिया आणि तिचा भाऊ शौविक याने अनेकदा गांजा खरेदी करून सुशांतला दिला आहे, असा आरोप एनसीबीने (केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभाग) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष नारकोटिक ड्रग्स (Drugs) आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स (एनडीपीएस) न्यायालयात केला आहे. यासंबधी रियासह अन्य आरोपींवर आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडली जाईल.
रियाचा भाऊ अंमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात होता. तो त्यांच्याकडून गाजा आणि चरसची आँर्डर घेत असत. त्या ऑर्डर सुशांतला देत असत. या प्रकरणातील आरोपी आणि ड्रग्स पेडलर्स सॅम्युल मिरांडा, शौविक. दीपेश सावंत यांच्याकडून अनेकदा सुशांतला दिला आहे. शौविकच्या सांगण्यावरून तिने मार्च आणि सप्टेंबर 2020 पर्यंतचे अंमली पदार्थाचे पैसेही दिल्याचा आरोप एनसीबीनं लावलेला आहे. या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सुशांतच्या आत्महत्येत निर्माता क्षितिज प्रसादला (Producer Kshitij Prasad) ही अटक करण्यात आली आहे. तो सध्या जामिनावर आहे. मला या प्रकरणात विनाकारण ओढलं जात आहे. माझा उल्लेख फक्त चॅटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आपण निर्दोष आहोत, असा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडे क्षितिज प्रसादने केला होता. या प्रकरणी विशेष न्यायाधीश व्ही. जी रघुवंशी यांच्यासमोर 27 जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे.
थोडक्यात बातम्या
आदित्य ठाकरेंवरील टीकेमुळे किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या…
‘द्रौपदी मुर्मूंकडून दुष्ट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
मोठी बातमी! श्रीलंकेत आणीबाणी जाहीर
लस घेतल्याने ‘या’ कॅन्सरचा धोका कमी होणार, अदर पूनावाला यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
लिंबू पाणी जितकं प्रभावी तितकंच घातकही, उद्भवू शकतात ‘हे’ सहा आजार
Comments are closed.