‘या’ 3 बँकांचा ग्राहकांना दणका; घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला जास्तीचा EMI आणि कर्ज घेणार असाल तर तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज घ्यावं लागणार आहे.

एसबीआयसह इतर बँकाही कर्जाचे दर वाढवत आहेत. महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 225 बेसिसवरून 6.25 टक्क्यांवर गेला आहे. फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा RBI रेपो रेट वाढवणार की काय याची चिंता आहे.

वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 15 जानेवारीपासून एक वर्षासाठी 8.30 ते 8.4 टक्क्यांनी व्याजदर वाढवलं आहे. याचा परिणाम म्हणून EMI मध्ये देखील वाढ होणार आहे.

दरम्यान, फेडरल बँकेने रात्री MCLR 8.95 टक्क्यांवर वाढवला आहे. एक महिन्याचा MCLR आता 9 टक्के, तीन महिन्यांचा MCLR 9.05 टक्के, सहा महिन्यांचा MCLR 9.15 टक्के आणि एक वर्षाचा कर्जाचा दर 9.20 टक्के झाला आहे. मूळ दर 9.63 टक्के आहे.

कोटक महिंद्रा बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, MCLR आता 8.15 टक्के, एक महिन्याचा MCLR 8.40 टक्के, तीन महिने 8.55 टक्के, सहा महिने 8.75 टक्के, एक वर्ष 8.95 टक्के, दोन वर्षांचा 9 टक्के आणि तीन वर्षांचा MCLR आता 9.15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-