लखनऊ | इफ्तार पार्टीला न बोलवल्याचा राग मनात ठेवून मामेभावाने 3 लहान मुलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथील ही घटना आहे.
आरोपी मलिक याला इफ्तार पार्टीला बोलवण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याने विशीतल्या दोन मित्रांच्या सहाय्याने आसमा, हसीन आणि अब्दुल यांचे अपहरण केले. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व त्यांना हौदात टाकून दिले.
मुले अचानक बेपत्ता झाल्याने कुटुबीयांनी शोधाशोध केली. अखेर त्यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली पण पोलिसांनी या गोष्टीला गांभीर्याने घेतले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी या तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले. हलगर्जीपणा दाखवल्याने 2 पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच आरोपी मलिकला पोलिसांनी पकडले असून इतर दोन आरोपी फरार आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पंकजांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना दिला उजाळा; जुना व्हीडिओ केला शेअर
-काँग्रेस पक्षात ‘या’ 3 बड्या नेत्यांना मिळणार मोठी बजाबदारी??; नव्या समीकरणांची नांदी
-मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यामागे महिलांचा हात!
-… म्हणून काँग्रेसला निवडणुकीत मोठा फटका बसला- हर्षवर्धन पाटील
-जगनमोहन रेड्डींनी घेतली मोदींची भेट; सोबतच एक अपेक्षाही केली व्यक्त
Comments are closed.