बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘3 तारखेचं प्रकरण संपूर्ण खोटं, व्हिडीओत दिसणारा व्यक्ती भाजपचा उपाध्यक्ष’; नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यनच्या समर्थनात आणि विरोधात अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे. त्यामुळे आता राजकारण देखील तापलेलं दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणात मोठा गोप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी एनसीबी आणि भाजपवर आक्रमकपणे टीका केली आहे. त्यावेळी त्यांनी एक व्हिडीओ देखील दाखवला. त्याचबरोबर एक सेल्फी फोटो देखील दाखवला. जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक टक्कल असलेला व्यक्ती आर्यनला घेऊन जाताना दिसत आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीचा आर्यनसोबत एक सेल्फी देखील असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.

आर्यन सोबत असलेल्या व्यक्ती हा आमचा अधिकारी नसल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे तीन तारखेचं प्रकरण संपूर्ण खोटं आहे. व्हिडीओत दिसणार मनिष भानुषाली हा व्यक्ती भाजपचा उपाध्यक्ष असून याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान, एनसीबी आणि भाजपचे काय संबंध आहेत हे एनसीबीने  स्पष्ट करावं, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. प्रायवेट लोकांना हायर करण्याचं काम करणारे अधिकारी एनसीबीत आहे का? असा सवाल देखील नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केला आहे. नवाब मलिक यांच्या आरोपामुळे आता राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे.

थो़डक्यात बातम्या-

आता Airtel देणार Jioला टक्कर! 5G नेटवर्कसाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘शेतकऱ्यांना चिरडणारी थार कार आमचीच…’; केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची कबुली

…आणि म्हणून काँग्रेस उद्यापासून ‘जेलभरो’ आंदोलन करणार

पोलिसांनी भाजपच्या माजी महिला खासदाराला केस ओढत धक्के देत गाडीत ढकललं, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा एकदा बाॅम्बे रुग्णालयात दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More