बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!

दुबई | आयपीएल दरम्यान अनेकदा गंमतीचे, सुखाचे तसंच भावूक क्षण पहायला मिळतात. असाच एक भावूक क्षण काल शारजाहच्या मैदानावर पहायला मिळाला.

किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मनदीप सिंगने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी केली. मनदीपने 56 चेंडूंमध्ये 66 रन्सची खेळी केली. अवघ्या 3 दिवसांपूर्वी वडिलांचं निधन झालं होतं आणि हे दुःख विसरत त्याने आपलं कर्तव्य बजावलंय. त्याची ही उत्तम खेळी वडिलांसाठी श्रद्धांजली होती.

पंजाब आणि हैदराबाद विरूद्धच्या मॅचला सुरुवातीला मनदीपच्या वडिलांचं आधीच्या रात्री निधन झालं होतं, मात्र या सामन्यातही मनदीप मैदानात उतरला होता.

पंजाबची टीम बॅटिंगसाठी उतरली तेव्हा मनदीप सिंग केएल राहुलसोबत बॅटिंगसाठी आला. 14 बॉलमध्ये 17 रन करुन मनदीप यावेळी माघारी परतला होता.

महत्त्वाच्या बातम्या

चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलं पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा

उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही – कंगणा राणावत

“नारायण राणेंची वैद्यकीय तपासणी करायला हवी”

काहीजण पराभवाच्या वर्षपूर्तीसाठी बीडमध्ये येऊन गेले- धनंजय मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More