बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी उद्यापासून 3 दिवसांची सुट

परभणी | कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच काही जिल्ह्यांमध्ये संपूर्णतः लॉकडाऊन देखील करण्यात आला आहे. त्यापैकीच परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून संपूर्णतः बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले होते.

दरम्यान, नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांमध्ये थोडी शिथीलता देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 मे पर्यंत कडक संचारबंदीचे आदेश लागू केले आहे.

परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सोमवारपासून पुढचे तीन दिवस जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना सूट दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार किराणा दुकानं, फळ व भाजीपाला विक्रेते हे आपले दुकान सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुले ठेवू शकतात.

संपूर्ण परभणी जिल्ह्यात दुपारी 2 नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्वीच्या आदेशाप्रमाणे संपूर्णतः कडक निर्बंध लागू असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी असणार नाही. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील नागरिकांना काही प्रमाणात लॉकडाऊनमधून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ दिल्याने दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

आयपीएल गाजवलेल्या युवा खेळाडूवर दु:खाचा डोंगर; भावाच्या आत्महत्येनंतर वडिलांचं कोरोनाने निधन

“शिवसेनेसारखं इतरांना जमलं नाही, म्हणून आज अनेक राज्यांमध्ये चिता पेटलेल्या दिसत आहेत”

मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

“रुग्ण कमी होत आहे म्हणून सुखावून जाऊ नका”

‘कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोरोना रिपोर्टची आवश्यकता नाही’; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More