बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

पुणे | यंदा जूनच्या सुरूवातीलाच पावसाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच जून महिन्यात महाराष्ट्रातल्या सर्वच भागांत पावसाने हजेरी लावली. 3 जुलै रोजी पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

येत्या 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पवासाची शक्यता वर्तवली गेली आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली गेली आहे.

कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुढील दोन दिवसांनी कोकणात तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या 3 ते 4 दिवसानंतर राज्यातील पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असं पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

तब्बल 1 कोटी लोकांची शिवभोजन थाळीने भागवली भूक, मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेचं कौतुक

महत्वाच्या बातम्या-

पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला द्यावा; आणखी एका काँग्रेस नेत्याचा शरद पवारांना टोला

या कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी राज्य शासनाची रेल्वे मंत्रालयाला विनंती

या विभागातील कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू, मंत्री गुलाबराव पाटलांची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More