Top News पुणे महाराष्ट्र

पुणे-सोलापूर रोडवर 3 ठार; फॉर्च्युनर गाडीचाही झाला चक्काचूर

इंदापूर | रविवारी 7 फेब्रुवारी रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण जवळ डाळज नं-2 च्या हद्दीत मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकला वेगात आलेल्या फॉर्च्युनरनं पाठीमागून धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं असून, फॉर्च्युनर गाडीचा चक्काचूर झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातात झालेल्या व्यक्तींचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने काढावे लागले. तसंच जखमींना तातडीनं भिगवन आणि पुणे भागात उपचारासाठी पाठवण्यात आलं.

दरम्यान, भिगवण पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघातामुळं कोंडलेली वाहतूक सुरळीत करुन दिली. भिगवणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष रुपनवार या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

हम तो मरेंगे सनम, तुमको भी ले मरेंगे; ‘रोझ डे’ ठरला काळजाचा थरकाप उडवणारा

“फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली याचा अर्थ ती सेक्सच्या शोधात आहे असा नाही”

शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी तीन चार उद्योगपती देव- राहुल गांधी

घमंड ज्यादा हो तो हस्तीयाँ डूब जाती है- संजय राऊत

साहेबाचा कुत्रा हरवला, पोलिसांनी दिवस-रात्र एक करुन शोधला!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या