बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेल्वे ट्रॅक दुरूस्त करणाऱ्या 4 महिलांना ट्रेननं उडवलं, 3 जणींचा जागीच मृत्यू

मुंबई | रेल्वे ट्रॅक दुरूस्त करणाऱ्या 4 महिलांना ट्रेननं उडवल्याची दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत 3 महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर मालाड स्टेशनजवळ ही घटना घडली.

ट्रॅक दुरूस्त करताना एकाच वेळी 2, 3 ट्रेन येताना दिसल्या. पण कोणती लोकल कोणत्या ट्रॅकवर येणार याचा महिलांना अंदाज आला नाही. महिला काम करत असलेल्या ट्रॅकवर ट्रेन आली, तेव्हा गोंधळ उडाल्यानं ट्रेननं जोरदार धडक दिली.

गँगमन तसंच रेल्वे ट्रॅक दुरूस्तीच्या टीममध्ये या महिला काम करत होत्या.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More