नाशिक महाराष्ट्र

नाशिकमध्ये कोरोनामुळे 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू!

नाशिक | नाशिकमध्ये एका 3 महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सर्वात कमी वयाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही नाशिकमधील पहिलीच घटना आहे.

3 महिन्याच्या बाळाला इतरही काही दुर्धर आजार होते. त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया देखील पार पडली होती. तसेच कोरोनाची लागण झाल्याने उपचारादरम्यान रुग्णालयात या बालकाचा मृत्यू झाला, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. ते एबीपी माझीशी बोलत होते.

लहान मुलांना शक्यतो गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळा त्यांची विशेष काळजी घ्या, असं आवाहन बापूसाहेब नागरगोजे यांनी नाशिककरांना केलंय.

गेल्या आठवड्यातील ही घटना असून सर्व अहवाल तपासल्यानंतर शासनाच्या पोर्टलवरही याबाबत माहिती दिली गेली आहे.

थोडक्यात बातम्या-

“कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, आता जास्त काळजी घ्यावी लागेल”

पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश राजकीय हेतूने- चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा बातचितचा प्रस्ताव फेटाळला!

कोरोनाच्या आणखी एका प्रकारानं ब्रिटनमध्ये हाहाकार!

मराठा समाजासाठी महाविकासआघाडी सरकारने घेतला हा मोठा निर्णय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या