देश

“3 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार केला जातो, ती देखील असंस्कारी आहे का?”

नवी दिल्ली | मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक वक्तव्य उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे. यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपा आमदाराचे विचार अत्यंत खराब आहेत. बलात्कार रोखण्यासाठी योगी सरकारचे आमदार म्हणतात मुलींना संस्कार द्यावे. अशा विचारसरणीच्या लोकांवर पदावर बसवलं आहे. त्यामुळेच यूपीत मुलींवर अत्याचार होत आहेत, असं स्वाती मालीवाल यांनी म्हटलंय.

त्या माणसाला जाऊन विचारा 3 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार होतो ती असंस्कारी असते का?, असा सवाल स्वाती मालीवाल यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्याजवळ गिरीश महाजनांची अनेक गुपितं, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”

‘किसी का दर्द मिल सके तो ले उधार…’; शशी थरूर यांचा भाजपला टोला

नोएडा पोलिसांनी प्रियांका गांधी यांची माफी मागितली, म्हणाले…

पंजाब विरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचं असंही अनोखं शतक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या