Top News खेळ

‘या’ कारणामुळे न्यूझीलंडमधून पाकिस्तानचा संपूर्ण संघ होऊ शकतो हद्दपार!

न्यूझीलंड | पाकिस्तान आणि न्यूझीलंड दौऱ्याला 18 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र या दौऱ्याअगोदरच दौरा संकटात आहेत. या संकटात अजून एक भर म्हणजे पाकिस्तानचे अजून 3 खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.

पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या एकूण 53 सदस्यांपैकी आतापर्यंत 10 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. यापूर्वी 6 खेळाडूंचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

दरम्यान क्वारंटाईन नियम मोडल्यामुळे पाकिस्तानी संघाला आधीच न्यूझीलंड सरकारने फायनल वॉर्निंग दिली होती. आता पु्न्हा कोरोना रूग्ण आढळल्याने त्यांच्या सरावावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

पाकिस्तानी क्वारंटाईनमधील खेळाडू भेटताना तसंच जेवण वाटताना दिसले होते. त्यावेळी न्यूझीलंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना समज दिला होता. त्यावेळी अजून एक चूक झाल्यास त्यांना देशातून हद्दपार करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे आता न्यूझीलंडमधून पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला करणार हद्दपार का हा प्रश्न उपस्थित होतोय.

महत्वाच्या बातम्या-

उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय

रश्मी ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधत उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

“आपल्यावर शेतकऱ्यांचं कर्ज आहे, लाठ्या-काठ्या, अश्रुधुराच्या माऱ्याने ते फिटणार नाही”

“आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या