Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी विधान परिषदेच्या जागा भरण्याचं सुतोवाच करण्यात आलं होतं. अशात विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून 3 नावांची सध्या चर्चा सुरू आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी या नावांची शिफारस केली जाणार आहे.
विधान परिषदेसाठी ‘या’ 3 नावांची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी रूपाली चाकणकर (Rupali Chakankar), सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) आणि आनंद परांजपे (Anand Paranjape) यांची नावे दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानपरिषदेच्या या 12 जागांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी दिली जाते. याच गोष्टींचा विचार करून ही संधी दिली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. बँकींग क्षेत्रामध्ये सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) यांचं मोठं नाव आहे. ते मुंबई बँकेचे उपाध्यक्ष आहेत.
रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचं एक प्रतिष्ठाण आहे. लवकरच या तिघांची नावे जाहीर केली जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Ajit Pawar | विधानपरिषदेच्या 12 जागा रिक्त
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही नावे जाहीर करणे अशक्य असल्यामुळे या आठवड्यातच राज्यपालांकडे नावे पाठवावीत, असं सत्ताधारी पक्षाने ठरवलं असल्याची माहिती आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या रिक्त 12 जागांपैकी सहा जागा भाजप घेणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन जागा देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
खबरदार… विसर्जनानंतर बाप्पाचे फोटो काढाल तर पस्तावाल, पोलिसांचे आदेश काय ?
“काढणीला आलेलं पीक गेलं, सरकारने आता लाडका शेतकरी..”; राज ठाकरेंचं आवाहन
पवार साहेबांनी ‘या’ मतदारसंघातील उमेदवार केला जाहीर; बड्या नेत्याला देणार टक्कर
शनीदेव ‘या’ राशींना करणार धनवान, राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने उजळणार भाग्य
येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट