उस्मानाबाद महाराष्ट्र

उमरग्यात तीन मुलांचा खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू

उस्मानाबाद | उमरगामध्ये तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. उमरगा तालुक्यातील कोळसुरमधील दयानंद नगर तांड्यावर ही घटना घडली आहे. त्यामुळे या ठिकाणी शोककळा पसरली आहे.

तांड्यावरील तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्यावर भर टाकण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. या खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं. खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले बुडून मृत्यू पावली आहेत.

उमरगा तालुक्यातील कोळसुर कल्याणीमध्ये दयानंद नगर तांड्यावरील तीन मुलांचा दुर्दैवी अंत झालाय. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या तीन मुलांमध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. अंजली संतोष राठोड, प्रतीक्षा मधुकर पवार आणि ओंकार राजुदास पवार अशी या तीन मृत मुलांची नावं आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी असलेल्या स्थानिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरगातील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेत. खड्डे खोल असल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने या बालकांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजपने राजकारण करू नये- सतेज पाटील

राज्यात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; दिवसभरात ‘इतक्या’ हजार कोरोनाबाधितांची नोंद

वाढदिवसानिमित्त सोनू सूदने केली मोठी घोषणा; 3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील रूग्णालयात दाखल

सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या