बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात इतक्या आठवड्याचा लॅाकडाऊन?; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचं दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात नुकताच विकेंड लॉकडाऊन घोषित केला आहे. राज्यात कडक निर्बंध लाऊनही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळत असल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.

महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचं बोलून दाखवलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमधील मंत्र्यानेच आता महाराष्ट्रात लॉकडाऊनचे संकेत दिले असल्याचं पाहायला मिळत आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय करून लसींचा तुटवडा असतानाही पुरवठा केला नाही तसेच गुजरातला जास्त लसी देऊन महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला, असं मत व्यक्त करून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांचे जीव वाचवायचे असतील तर राज्यात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज विनंती करणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू होणार का? याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. नुकतेच विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलवर निर्बंध येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत संकेत दिल्याने जनतेमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

“लस आहे पण देण्याची ऑर्डर नाही, कोरोनाकाळातील अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकारने….”

“लस उत्सव साजरा करण्यासाठी आधी लस तरी उपलब्ध करून द्या” – जयंत पाटील

IPL 2021 : MI vs RCB, ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

मध्य रेल्वेचा प्लॅटफाॅर्मवरील गर्दी टाळण्यासाठी ‘हा’ महत्वपुर्ण निर्णय

‘ज्याला दोनवेळा आमच्या दत्तामामानं पाडलं तो आता…’; अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोला

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More