बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयटीचं बँड वाजणार, 30 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता

मुंबई | 2004 पासून भारतात सेवा क्षेत्राला मोठी गती मिळाली. संगणक आणि इंटरनेटच्या प्रगतीमुळे गेल्या दोन दशकात सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजेच व्हाईट काॅलर कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. विदेशी कंपन्यांनी भारतात तळ ठोकून भारतीय मानवी संसाधनांचा योग्य प्रकारे वापर केला. परंतू आता वाढत्या तंत्रज्ञानामुळं मानवी वापरापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर जास्त होणार आहे.

आयटी क्षेत्राच्या उद्योगांमध्ये वाढत असलेल्या ऑटोमेशन तंत्रज्ञानामुळे 30 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासंदर्भात बँक ऑफ अमेरिकाकडून नोकऱ्या जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2022 पर्यंत तंत्रज्ञान क्षेत्रातील पर्यंत 16 दशलक्ष लोकांना रोजगार देणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतू वाढत्या तंत्रज्ञान क्षेत्रामुळे आता देशांतर्गत सॉफ्टवेअर कंपन्या 30 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत.

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांपैकी 60% पेक्षा जास्त कर्मचारी कौशल्य सेवा क्षेत्रात आणि बीपीओ मध्ये काम करतात. भारतात या क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेतील कंपन्या भारतीय आयटी क्षेत्रावर सध्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून रोबोट प्रोसेस ऑटोमेशनद्वारे काम करण्यात येणार आहे.

रोबोट प्रोसेस ऑटोमेशनच्या तंत्रज्ञानामुळे मोठ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात 100 अब्ज डॉलर्सची बचत होईल, असं बँक ऑफ अमेरिकाच्या एका अहवालातून समोर आलं आहे. टीसीएस,विप्रो, इन्फोसिस, एचसीएल, टेक महिंद्रा, कोग्निजेंट आणि अन्य कंपन्या आरपीए तंत्रज्ञानाद्वारे काम करणार असल्यानं या कंपन्या येत्या काळात कर्मचाऱ्यांची कपात करतील अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता…’; संजय राऊतांचा भाजपला इशारा

…तर आपल्याला तिसऱ्या लाटेलाही सामोरं जावं लागेल- उद्धव ठाकरे

लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलाय पुरूषार्थ?- चित्रा वाघ

उद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार- किरीट सोमम्या

मनसुख हिरेन प्रकरणात नवं वळण; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचा छापा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More