नवी दिल्ली | देशात 24 तासांत कोरोनाचे 693 नवे रुग्ण आढळले आहेत. देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4067 वर पोहोचला आहे. यापैकी 1,445 रुग्ण तबलिगीशी संबंधित आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 76% पुरुष तर 24% महिला आहेत, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.
कोरोनाने आतापर्यंत देशभरातील 109 जणांचा बळी घेतला आहे. कोरोनामुळे काल देशभरात 30 जण दगावले. देशातील 63% कोरोनाबळी 60 पेक्षा अधिक वयाचे, तर 30% मृत 40 ते 60 वर्षे वयोगटातील असून 7% मयत हे 40 पेक्षा कमी वर्ष वयाचे होते, अशी देखील माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय रेल्वेने 13 दिवसांमध्ये 1340 मालवाहू गाड्यांच्या माध्यमातून साखर आणि 358 टँकरच्या माध्यमातून खाद्य तेल देशाच्या विविध कान्याकोपऱ्यात पोहोचवले आहे, अशी माहिती लव अग्रलाल यांनी दिली आहे.
दरम्यान, आतापर्यंत 16.94 लाख मॅट्रिक टन अन्नधान्य देशभरात पाठवण्यात आलं आहे, असं लव अग्रलाल यांनी सांगितलं आहे.
Number of #COVID19 deaths stand at 109, with 30 people succumbing to it yesterday. 63 per cent of the deaths have been reported among people over 60 years age, 30 per cent in age bracket of 40 to 60 years & 7 per cent victims were below 40 years age: Lav Aggrawal, Health Ministry https://t.co/fj6gx4QuDy
— ANI (@ANI) April 6, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
कौतुकास्पद! पठाण बंधूंनी गरजू व्यक्तींसाठी दान केलं 10 हजार किलो तांदूळ
“बेरोजगारी वाढण्याचं संकट मोठं, येत्या काळात तज्ज्ञ-जाणकार लोकांशी बोलून उपाययोजनांची चर्चा करा”
महत्वाच्या बातम्या-
‘आम्हाला पैशांची समस्या नाही तर…’, केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर
14 एप्रिलनंतर ग्रामीण भागातली टाळेबंदी सरकारने उठवावी- राजू शेट्टी
सरकारचा मोठा निर्णय! खासदारांच्या वेतनात वर्षभरासाठी ‘इतक्या’ टक्क्यांची कपात
Comments are closed.