Top News मुंबई

३१ डिसेंबरला संचारबंदीची अट शिथिल करा; मनसेची मागणी

मुंबई । राज्य सरकारने ५ जानेवारी पर्यंत रात्रीचा वेळी संचारबंदी लागू केली आहे. यामुळे ३१ नाईटचा आणि नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्सोष मनासारखा करता येणार नाहीये.

दरम्यान तरुणांना याचा आनंद घेता यावा यासाठी मनसेने पुढाकार घेतलाय. सरकारने लादलेल्या संचारबंदीच्या अटी ३१ डिसेंबरच्या दिवशी शिथिल कराव्यात अशी मागणी मनसेने केलीये.

यासाठी मनसेने, आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि नवीन वर्षाच्या स्वागत जोषात करणार आहोत, असा इशाराच राज्य सरकारला दिलाय.

रूग्ण कमी झाल्याचा दावा करत मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही मागणी केलीये. वर्षभर सण उत्सव हे निर्बंधातच गेल्याने एका दिवसापुरती हा निर्बंध उठवावे अशी मागणी जाधव यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनीच आग्रह करावा”

‘खडसेंना आलेली ईडीची नोटीस नेमकी कशासंदर्भात?’; खडसेंनी केला खुलास

‘आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्यानं केलं भाकीत

दिल्लीतील काही लोकं टोमणे मारून माझा अपमान करतात- पंतप्रधान

पुणे तिथे काय उणे! मुंबईकरांना मागे टाकत पुणेकर ‘या’ मध्येही अव्वल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या