औरंगाबाद | भीषण दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं जगणं कठिण झालं आहे. यातच गेल्या पाच महिन्यांमध्ये तब्बल 313 शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केल्याची माहिती मिळत आहे.
दुष्काळामुळे शेतकरी हैराण झाला आहे. बिघडलेली आर्थिक स्थिती आणि त्यातून काढण्यात आलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत.
जानेवारी ते मे महिन्यात मराठवाड्यातील 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे. सर्वात जास्त 69 शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून 45 आत्महत्या उस्मानाबादमध्ये झाल्या आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी आत्महत्येचा मुद्दा दुर्लक्षीत झाला. मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
-या’ देशाच्या राष्ट्रपतींनी घेतलं भरसभेत पाच महिलांचं चुंबन
-माझ्या सत्कारावर खर्च करु नका, दुष्काळ निवारणावर पैसा खर्च करा- सुजय विखे
-काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधींची निवड
-मुस्लीम या देशात भाडेकरु नाही तर भागीदार- असदुद्दीन ओवैसी
-बजरंग सोनवणेंना हिंम्मत देण्यासाठी धनंजय मुंडे झाले कवी; सादर केली ‘ही’ कवीता
Comments are closed.