बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

31st निमित्त पुण्यातील वाहतूकीत बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते बंद राहणार

पुणे | सध्या सर्वच जण 2021 वर्षाला निरोप देण्याच्या (GoodBye 2021) आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत दंग आहेत. मात्र आता पुणेकरांसाठी (Pune Citizens) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यातील काही मुख्य रस्ते शनिवारी म्हणजे 31 डिसेंबरला काही काळासाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना आता रात्री उशीरापर्यंत या रस्यांवर फिरता येणार नाही.

पुण्यातील काही रस्त्यांवर प्रशासनाने नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर केलं आहे. आज संध्याकाळी 7 ते उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत हे रस्ते नो व्हेईकल झोन असणार आहे. शनिवारी दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या परिसरामध्ये नो व्हेईकल झोन असणार आहे.

पुण्यातील प्रसिद्ध जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता बंद राहणार आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक म्हणजेचं गुडलक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रोड बंद असणार आहे. याशिवाय झाशीची राणी चौक ते खंडोजीबाबा चौक, महात्मा गांधी रस्ता त्याचबरोबर हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक बंद राहणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रात्री 9 नंतर नाईट कर्फ्यू लावला आहे. या वेळेनंतर जर कोणी बाहेर फिरताना आढळले. तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

माझी ‘परफेक्ट वाईफ’ म्हणत रितेशने शेअर केला जेनेलियाचा व्हिडीओ

“सिंधुदुर्गात आघाडीचो भोपळो फुटलो, देवांक…”, आशिष शेलारांचं मालवणी भाषेत ट्विट

“भाजपचा कार्यकर्ता ‘अरे ला, का रे’ करायला घाबरणार नाही”

“कारस्थान करून निवडणूक जिकंता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण…”

धक्कादायक! Omicronमुळे देशात दोन बळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More