बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अवघ्या 32 वर्षीय IRS अधिकारी अनंत तांबेंचं कोरोनानं निधन!

मुंबई | IRS अधिकारी अनंत तांबे यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. ते अवघ्या 32 वर्षांचे होते. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अनंत तांबेंचं अवघ्या 32 व्या वर्षी निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे अतिरिक्त खाजगी सचिव म्हणून अनंत तांबे काम पाहत होते. अनंत तांबे यांच्या निधनानंतर मंत्री जावडेकर यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. श्री. तांबे यांच्या अचानक आणि अकाली निधनामुळे फार दु:खी आहे. कोविडमुळे वयाच्या 32 व्या वर्षी अनंत तांबे यांचे निधन झाले. ते अतिरिक्त पीएस म्हणून काम करत होते, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.

एक तरुण आणि तेजस्वी आयआरएस अधिकारी गमावल्याचं दु:ख आहे. माझ्या प्रार्थना त्याच्या कुटुंबासमवेत आहेत, असं ट्विट प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. तांबे हे चांगले अधिकारी म्हणून परिचीत होते.

दरम्यान, भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. तर काल दिवसभरात तब्बल 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

ममता बॅनर्जी यांची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड; 5 मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

‘आमच्याशी असं वागण्याची तुमची हिंमत कशी झाली?’; आयपीएल समालोचकाचा पंतप्रधानांना सवाल

‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला…’; अदर पुनावाला यांनी दिलं स्पष्टीकरण

मराठी चित्रपटसृष्टीला धक्का! फर्जंद, फत्तेशिकस्तमधील कलाकाराचा कोरोनामुळे मृत्यू

‘ …तर CT-SCAN करू नका’, एम्सच्या संचालकांनी दिला महत्वाचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More