बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टीव्हीवर सामन्याचे प्रक्षेपण दोन ते अडीच सेकंड लेट, मग बुकींनी डोंगरच गाठला थेट!

पुणे | भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुण्यात दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. मात्र या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे दोन ते अडीच सेकंड लेट होतं. याचाच फायदा घेत या सामन्यावर डोंगरावरून नजर ठेवून सट्टा लावणाऱ्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

गहुंजे क्रिकेट मैदानाच्या जवळील गोदरेज प्रॉपर्टी, घोरडेश्वर डोंगर आणि पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलमधून सट्टेबाज बुकींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या बुकींकडून 45 लाखांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये कॅमरे, दुर्बिणी, विदेशी नोटा यांचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी 8 बुकींना घोरडेश्वर टेकडीवरुन ताब्यात घेतलं. हे दुर्बिणीतून सामन्यावर लक्ष ठेवून होते. प्रत्येक बॉलवर लक्ष ठेवून हे 8 जण सट्टा लावत असल्याचं समोर आलं आहे. ही आंतरराज्यीय टोळी असल्याचा अंदाज पिंपरी चिंचवड पोलिसांनी वर्तवला आहे. यामध्ये मध्यप्रदेश येथील 5, हरियाणा येथील 13, महाराष्ट्रातील 11, राजस्थान येथील 2 आणि गोवा, पोर्तुगाल, उत्तर प्रदेश येथील प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे.

हे सर्व बुकी महाराष्ट्रातील तसंच परराज्यातील आहेत. हे आरोपी गहुंजे क्रिकेट मैदानाजवळच रहायला होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण!

‘…तर मग मोदींनी सत्याग्रह कशासाठी केला?’; ‘या’ शिवसेना खासदाराची मोदींवर बोचरी टीका

“नरेेंद्र मोदीजी अजून किती फेकणार, आता हद्द झाली राव”

मनसुख हिरेनच्या पोस्टमार्टमपूर्वी सचिन वाझेंनी घेतली होती डाॅक्टरांची भेट; NIA च्या हाती लागली ‘ही’ माहिती

आलिया भट्टच्या आईचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाल्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More