बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्रिकेट विश्वावर दुखा:चा डोंगर; 33 वर्षीय अश्विन यादवचं निधन

मुंबई | भारतीय क्रीडा विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादवचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अश्विन अवघ्या 33 वर्षांचा होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि त्याची तीन मुले आहेत.

अश्विनने 2009 साली मुंबईविरुद्ध शेवटची रणजी ट्रॉफी मॅच खेळली. यानंतर तो स्टेट बँक ऑफ हैदराबादसाठी स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळायचा. भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी अश्विनच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

अश्विन यादवच्या जाण्याने मी खूप दुखी झालोय, मला मोठा हादरा बसलाय, एक हसतमुख खेळाडू आपल्यातून निघून गेलाय. तो ‘टीम मॅन’ होता. मी देवाकडे प्रार्थना करतो ती ईश्वराने हा आघात सहन करण्याची ताकद त्याच्या कुटुंबाला देवो. क्रिकेटमध्ये नक्कीच अश्विनची कमी भासेल. ओम शांती, असं ट्विट आर श्रीधर यांनी केलं आहे.

अश्विनसोबत खेळलेला ऑफ स्पिनर विशाल शर्मा यानेही त्याच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं. अश्विनच्या चेहऱ्यावर कायमच हसू असायचं, तो टीमसाठीच कायम खेळायचा. अश्विनचा मृत्यू झाला आहे, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही, असं विशाल शर्मा म्हणाला.

थोडक्यात बातम्या- 

18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देणार का?, अजित पवार म्हणाले…

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; सलग सहाव्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

हजारदा सांगूनही श्रवण राठोडांनी मुलाचं ऐकलं नाही, म्हणाले- तू काय डॅाक्टर आहेस का?

‘ऑक्सिजन रोखणाऱ्याला आम्ही लटकवू, कोणालाही सोडणार नाही’; हायकोर्ट संतापलं

स्वत: कोरोना अनुभवलेला व्यापाऱ्याचा उपक्रम; 1 रुपयात ऑक्सिजन सिलेंडर भरून देण्याची सोय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More